तांदुळवाडीत चिमुकल्याने भरवला आनंद बाजार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

तांदुळवाडीत चिमुकल्याने भरवला आनंद बाजार..
प्रतिनिधी/ आजिनाथ कनिचे
चार भिंतीआड पुस्तकातील ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान मिळावे, म्हणून शाळेच्या प्रांगणात 100 बालकांनी दुकाने मांडली होती. स्वतःच्याच शेतातून आणलेल्या पालेभाज्या, फळे विक्रीसाठी आणून ठेवली होती.
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता. या आनंद बाजारात 20 ते 25 हजार रुपयांची उलाढाल झाली. या बाजारात पालकासह ग्रामस्थांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या आनंद बाजाराचे उद्घाटन तांदूळवाडीचे मा. सरपंच कुबेर गवळी, सरपंच रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाल आनंद बाजार सुरू केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. आनंदी बाजार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कुंभार सर, जाधव सर, कांदे सर, राक्षे मॅडम व सर्व सहशिक्षक यांनी परिश्रम घेतले. सर्व पालक वर्गाने आपल्या पाल्यांना विविध स्टॉल उपलब्ध करून प्रोत्साहन दिले.
या बाल आनंद बाजारात शेतातील पालेभाज्या, फळे तसेच खवयवांसाठी वडापाव, समोसे, भेळ, भजी, गुलाब जामून, राईस प्लेट, पाणीपुरी, चहा तसेच शैक्षणिक व स्टेशनरी सामान आदी स्टॉल लावण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी खरेदी करून बाल आनंद बाजाराचा आस्वाद घेतला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!