“अश्रूंना दिले शिक्षणाचे पंख” अश्रू फाउंडेशन मुंबईतर्फे पळासदडे शाळेतील 120 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अमळनेर : विक्की जाधव.
“चला अश्रूंची करूया फुले” हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या अश्रू फाउंडेशन, मुंबई या संस्थेने शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत आदर्श उपक्रम राबविला आहे. अमळनेर तालुक्यातील 1939 साली स्थापन झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळासदडे येथे इयत्ता पहिली ते आठवी मधील सुमारे 120 गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स, रायटिंग पॅड, चॉकलेट आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
या कार्यक्रमास अश्रू फाउंडेशनचे संस्थापक श्री. सुनील पाटील, सरचिटणीस श्री. रवींद्र खंडेराव मोरे, तसेच कमिटी सदस्य श्री. गोकुळ पंडित पाटील, श्री. हर्षल माहेश्वरी, श्री. विनोद चौधरी, श्री. गणेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुख्याध्यापक श्री. गुलाब नाना पाटील यांनी भूषविले. यावेळी मुख्याध्यापक श्री. प्रदीप रामदास चव्हाण, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. उमेश पाटील, उपसरपंच श्री. शरद पाटील, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.