न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

प्रताप महाविद्यालयात खानदेशातील लोकसंस्कृतीवर व्याख्यान संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात खानदेशातील लोकसंस्कृतीवर व्याख्यान संपन्न.

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले चोपडा येथील साहित्यिक व संशोधक डॉ.मधुचंद्र भुसारे यांचे “खानदेशातील लोकसंस्कृतीचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात त्यांनी खानदेशातील लोकसंस्कृतीचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उलगडून दाखविले.

डॉ.भुसारे यांनी खानदेशातील लोककला, लोकगीते, लोकपरंपरा, सण-उत्सव, बोलीभाषा आणि ग्रामीण जीवनशैली यांचा सखोल आढावा घेत लोकसंस्कृती ही केवळ भूतकाळाची स्मृती नसून ती समाजाची सांस्कृतिक ओळख जपणारी जिवंत परंपरा असल्याचे प्रतिपादन केले. आधुनिकतेच्या प्रवाहात लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सदरच्या कार्यक्रमास मराठी विभागप्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. विलास गावीत, प्रा.तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा.गोपाल बडगुजर, डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी तसेच महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार डॉ.ज्ञानसागर सूर्यवंशी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!