वैचारिक वारसा जिवंत ठेवणारे वसुंधरा ताई लांडगे खा.शी चे खरे वारस म्हणजेच अमळनेर चे सौभाग्यचं..

अपनी भाषा में पढ़े! Translate

वैचारिक वारसा जिवंत ठेवणारे वसुंधरा ताई लांडगे खा.शी चे खरे वारस म्हणजेच अमळनेर चे सौभाग्यचं..

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाची बहुप्रतिक्षित त्रिवार्षिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, या निवडणुकीमुळे संपूर्ण शिक्षण व सामाजिक क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त पदासाठी अनेक दिग्गजांसह नव्या चेहऱ्यांनीही मैदानात उतरण्याची तयारी केली असून, आपली भूमिका व विकासाची दृष्टी सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक उमेदवार दिवस-रात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. शिक्षणासोबत सामाजिक विकासाचा वारसा लाभलेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अधिक व्यापक काम करण्याची आश्वासने दिली जात आहेत.

या निवडणुकीत विश्वस्त पदासाठी उभ्या असलेल्या वसुंधरा दशरथ लांडगे (वसुंधरा ताई लांडगे) या नावाची विशेष चर्चा सुरू आहे. आदर्श स्त्रीवादी चळवळ अमळनेर शहरात प्रभावीपणे राबवणाऱ्या वसुंधरा ताईंनी गेल्या अनेक वर्षांत दोन हजारांहून अधिक विवाह सत्यशोधक पद्धतीने लावून समाजात समता, विवेक व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला आहे. इतिहास, वर्तमान व भविष्य यांची सांगड घालणारी त्यांची विचारधारा आधुनिक युगातील स्त्रीचे सशक्त व प्रेरणादायी रूप समाजासमोर मांडते.

खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत वसुंधरा ताई लांडगे विश्वस्त म्हणून उभ्या असून, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा सभासदांमधूनच आग्रह व्यक्त होत आहे. सामाजिक बांधिलकी, स्पष्ट विचार व कार्याचा ठसा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात असून, मंडळाच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!