नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची क्षमता फक्त शेतकरी राजा मध्येच… राहुल रंधे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोराडी येथे राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त बळीराजा सन्मान सोहळा उत्साहात साजरा…
बोराडी – शेतकरी राजा हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकरी राजावर अनेक वेळा नैसर्गिक संकट आली. तरी देखील त्यांना तोंड देण्याची क्षमता फक्त शेतकरी राजामध्येच असू शकते. आपल्याला नव्हे तर देशातील नागरिकांना अन्नपुरवण्याचे काम शेतकरी राजा करीत आहे. त्यासाठी आपण बोराडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आधुनिक शेती कशी करावी, बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शेतीत शाश्वतता कशी साधावी, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, सूक्ष्म सिंचन पद्धती, सेंद्रिय शेती, मृदा परीक्षण, पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील व्यवस्था याबाबत आपण वेळोवेळी कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच राहुल रंधे यांनी बोराडी ग्रामपंचायत वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिवसा निमित्ताने आयोजित बळीराजा सन्मान सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे हे होते तर. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी मधुकर पाटील, दत्तू पाटील, न्हानू भिल, मांगा पावरा, प्रताप पाटील, नारायण पावरा, ठानसिंग भिल, रामदास गुजर, महिंद्रा निकम ,शालिक पाटील, भटू पाटील, संदीप गुजर ,पुरुषोत्तम पवार,नाना पावरा, दिलीप पावरा,सदस्य विद्या रंधे, उर्मिला पावरा, नीता पवारा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंग पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंग कुवर, निलेश महाजन, सतीश पवार,
यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या विविध अंगांना चालना देण्याचे कार्य सुरू असताना बोराडी ग्रामपंचायतीने सामाजिक व कृषी क्षेत्रातही आदर्श उपक्रम राबविला. या अभियानांतर्गत बोराडी येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस अत्यंत उत्साहपूर्ण आणि अर्थपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कष्टाला, त्यांच्या योगदानाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्यांच्या भूमिकेला मान देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम गावासाठी अभिमानास्पद ठरणार असल्याचे मत ग्अरामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले.
या प्रसंगी ग्रामपंचायत बोराडीच्या वतीने ‘बळीराजा शेतकरी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. गावातील शेती व्यवसायात प्रामाणिकपणे कार्य करणारे, नविन प्रयोग करणारे तसेच विविध क्षेत्रांत योगदान देणारे शेतकरी यांचा यावेळी सन्मान उपसरपंच राहुल रंधे व ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला.या मार्गदर्शनामुळे पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक पद्धती अंगीकारण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळाली. शेती हा तोट्याचा व्यवसाय नसून योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाच्या सहाय्याने तो फायदेशीर कसा होऊ शकतो, याची जाणीव या कार्यक्रमातून करून देण्यात आली.
या सन्मान सोहळ्यासाठी साठी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, विस्तार अधिकारी महाले, संजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामपातळीवर दर्जेदार व शाश्वत विकासाची दिशा निश्चित झाली आहे. तसेच हा समारंभ यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, गजू पाटील, अंबादास सगरे, गणेश भामरे, मुकेश जाधव, दिपांशु पवार, चंद्रकांत बडगुजर, भूषण कुलकर्णी, उमेश पावरा, बादल पावरा, विजय पावरा तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
