December 10, 2025 5:34 am

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात भव्य जनजागृती रॅली

अपनी भाषा में पढ़े! Translate

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात भव्य जनजागृती रॅली

“दिव्यांग हक्क म्हणजे मानवी हक्क”

(प्रतिनिधी : पारोळा) (जि. जळगाव), दि. ३ डिसेंबर २०२५
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज समग्र शिक्षा अभियान, गटसाधन केंद्र (पं.स. पारोळा) व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित “परिश्रम” दिव्यांग मुला-मुलींची निवासी विशेष शाळा, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.जि.प. शाळा क्र. १ येथून सकाळी १०.३० वाजता रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीत “दिव्यांगांना समान संधी द्या”, “दिव्यांग हक्क म्हणजे मानवी हक्क”, “आपली जबाबदारी, त्यांचा सहभाग” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. रॅलीचा समारोप मुख्य बाजारपेठेमध्ये झाला.व्यासपीठावर उपस्थित मान्यवरश्री. नानासाहेब विश्वास पाटील (गटशिक्षणाधिकारी, पं.स. पारोळा)
श्री. अण्णासाहेब सी. एम. चौधरी (विस्तार अधिकारी व शा.पो.आ. अधिक्षक, पारोळा)
श्री. संजय पाटील (केंद्रप्रमुख)
श्री. गिरीश वाणी (केंद्रप्रमुख)
श्री. प्रमोद पाटील (तालुका समन्वयक, समावेशित शिक्षण)
श्री. मनीष जाधव (मुख्याध्यापक, परिश्रम दिव्यांग निवासी शाळा)

रॅलीत सहभाग“परिश्रम” दिव्यांग शाळेचे शिक्षक श्री. हेमंत महाजन, श्री. रामकृष्ण शेलकर, श्री. जगदीश सोनवणे, श्रीमती एस.एस. पाटील, श्रीमती व्ही.एल. पाटील, श्रीमती संगीता महाजन, श्री. विवेक पाटील, श्री. कुणाल महाजन, श्री. हर्षल महाजन, श्री. दीपक माळी तसेच समग्र शिक्षा अभियान व गटसाधन केंद्रातील श्रीमती सुनंदा बडगुजर, श्री. नितेश निकम, श्री. सचिन खोंडे, श्री. भूषण पाटील, श्री. जितेंद्र वाघ, श्री. मनोज माळी, श्रीमती मीनाक्षी नेरपगार, श्री. राहुल भोसले आदींचा उत्साहपूर्ण सहभाग होता.शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. रॅलीमुळे नागरिकांमध्ये दिव्यांगांबद्दलच्या अधिकारांबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली.दिव्यांग बांधवांचे हसू आणि उत्साह पाहून उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!