रतीलाल चौधर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले साहीत्यरत्न पुरस्कार प्रदान
(निलेश गायकवाड)
सामाजिक शैक्षणीक साहीत्य कला क्रिडा .व तंटामुक्त क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे सामाजिक क्षेत्रात काम करणारे रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना राज्यस्तरीय महात्मा फुले साहीत्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महात्मा फुले प्रबोधन मराठी साहीत्य संमेलनाच्या वतीने हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार खानवडी ता पुरंदर जि पुणे येथे पार पडलेल्या संमेलनात नाटय अभिनेत्री गौरी रत्नपारखी संयोजक दशरथ यादव संमेलन अध्यक्ष शिव व्याख्याते प्रशांत देशमुख ,कवी संजय बोरुडे ,कवयित्री स्वाती डुबे ,छायाताई नानगुडे,पत्रकार सेवानिवृत IGP सुरेश खोपडे,सुनिल माळी ,पुढारी पत्रकार गौरव कोलते ,सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या धिवार ,सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार ,अभिनेता सैराट चित्रपट यावेळी उपस्थित होते.रतिलाल चौधर हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असून त्यांनी त्यांच्या संपूर्ण सेवेमध्ये जनसेवेला वाहून घेतलेला आहे .जनसामान्यांच्या हितासाठी तळमळ मग ती तंटामुक्ती असो किंवा इतर सामाजिक कामातून असून ते सदैव जपत असतात .
त्यामुळे आदरणीय रतिलाल चौधर यांचा नावलौकिक ते सेवेत असतानाही होणार आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा होणार आहे .कारण त्यांची एक प्रतिमा खूप सुंदर बनलेली आहे. कुटुंबाची साथ, मित्रमंडळांची साथ आणि आई-वडिलांचा आशीर्वाद यामुळे आदरणीय रतीलाल चौधर हे चंद्र सूर्यासारखे तेजोमान झालेले आहेत.
मानवी जीवनाचे कल्याण जर कशामध्ये असेल तर ते इतरांना दुःखमुक्त करून इतरांच्या अडचणीत धावणे,परहित पहाणे,चुकलेल्या माणसाला सन्मार्गावर आणि स्वतःला शुद्ध बनविणे यामध्ये आहे.
आदरणीय चौधर यांचा नेहमी अभिमान वाटतो आणि इथून पुढे अभिमान वाटत राहणार आहे.खानवडी,पुरंदर जि.पुणे येथील १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनामध्ये मा.रतिलाल चौधर ,पोलीस अधिकारी, वालचंदनगर पोलीस स्टेशन यांना दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी जे मानपत्र दिलेले त्या मानपत्राचा अभिमान वाटतो.या मानपत्रासाठी रतिलाल चौधर पात्र होते.भविष्यात त्यांना चांगले आरोग्य लाभो.