December 10, 2025 3:49 am

विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करून सरपंचांनी दिला संवेदनशीलतेचा संदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करून सरपंचांनी दिला संवेदनशीलतेचा संदेश

(प्रतिनिधी : पारोळा) (जि. जळगाव), दि. १ डिसेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील नंदगावचे सरपंच श्री. दामोदर सुखदेव पाटील यांनी आपला वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा केला. त्यांनी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित “परिश्रम” दिव्यांग मुला-मुलींची निवासी विशेष शाळा, पारोळा येथे भेट दिली आणि शाळेतील सर्व विशेष विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाचा आनंद सामायिक केला.या प्रसंगी कलालीचे सरपंच ऍड. योगेश निंबा कोळी यांचीही विशेष उपस्थिती होती.शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिक्षकांनी दोन्ही मान्यवरांचा रोपे, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.श्री. दामोदर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी चविष्ट अल्पोपहाराची व्यवस्था केली. तसेच शाळेतील किराणा सामुग्रीसाठी ₹२,१००/-ची रोख देणगी दिली.आपल्या मनोगतात श्री. पाटील म्हणाले,
“अण्णासाहेब डॉ. योगेश महाजन सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे हे कार्य थक्क करणारे आहे. विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा झटणारा प्रत्येक कर्मचारी कौतुकास पात्र आहे. मी समाजातील सर्वांना आवाहन करतो की, आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग विशेष मुलांसोबत साजरा करा. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू हाच खरा आशीर्वाद आहे.”या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, विशेष शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निरागस हसू दिसत होते.अशा संवेदनशील उपक्रमांमुळे समाजात दिव्यांगांप्रती आदर व सहानुभूती वाढीस लागते, असा विश्वास अण्णासाहेब डॉ. योगेश महाजन यांनी व्यक्त केला.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!