प्रभाग १२ मध्ये युवा नेतृत्व सुयोग धनगर म्हणजे शब्दात ताकद, विचारात जनतेचा विश्वास!
प्रभाग क्रमांक 12 मध्ये सध्या एक नाव जोरदार चर्चेत आहे सुयोग नाना धनगर. तरुण, ऊर्जावान, जिद्दी आणि समाजकार्यातून तयार झालेलं हे नेतृत्व आज प्रभागातील मतदारांचा विश्वास सहज जिंकताना दिसत आहे. शब्दात ताकद, बोलण्यात प्रामाणिकपणा आणि विचारात विकासाची स्पष्ट दिशा यामुळे सुयोग धनगर हे खर्या अर्थाने जनतेचे उमेदवार ठरत आहेत.
गेल्या काही वर्षांत प्रभागात अनेक समस्या प्रलंबित राहिलेल्या असताना त्यांचे निराकरण करण्यासाठी सुयोग धनगर यांनी स्वतःच्या पातळीवर प्रयत्नांची शर्थ केली आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन तत्परतेने मदत केल्याने त्यांची प्रतिमा ‘नेहमी उपलब्ध राहणारं नेतृत्व’ अशी निर्माण झाली आहे. विकासाच्या प्रत्येक कामाकडे त्यांनी समान दृष्टीकोनातून पाहत सर्वांगीण बदल घडवण्याचा दृढनिश्चय केला आहे.
आज प्रभाग १२ मध्ये सुयोग धनगर यांच्या उमेदवारीला परिसरातून मोठी मागणी निर्माण झाली आहे. नाना धनगर यांनी कोरोना काळात केलेली अप्रतिम सेवा आणि त्याच सेवाभावी वृत्तीचा वारसा सुयोग भाऊ पुढे नेत आहेत. लोकांच्या मनात असलेला विश्वास, आणि तरुणाईत निर्माण झालेली ऊर्जा पाहता सुयोग धनगर हे प्रभागातील विकासाचे खरे शिल्पकार ठरण्याची लक्षणे ठळकपणे दिसत आहेत.