प्रभाग क्रमांक 10 मध्ये होणार बदल, मनीषा संजय मराठे यांच्या पराभवाची सावट स्पष्ट!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 10 मध्ये होणार बदल, मनीषा संजय मराठे यांच्या पराभवाची सावट स्पष्ट

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 ची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये तर असंतोषाची ठिणगी जणू ज्वालामुखीत बदलली आहे. अनेक वर्षे नगरसेवक राहूनही संजय मराठे यांनी प्रभागात कोणतेही ठोस काम केले नाही, अशी उघड चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, सुविधा या मुलभूत गरजांवर देखील मराठे दांपत्याने दुर्लक्ष केल्याने प्रभागातील नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच यावेळच्या निवडणुकीत मनीषा संजय मराठे यांचा पराभव ‘निश्चित’ असा सूर गल्लीबोळात जोरात घुमू लागला आहे.

प्रभागातील नागरिकांचे म्हणणे असे आहेत की “निवडणुक आली की येतात… आणि आश्वासन देऊन गायब होतात!” अशी ओळख संजय मराठेनी स्वतःच निर्माण केली असल्याचा आरोप स्पष्टपणे दिसत आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ प्रभागातील सर्वसामान्यांना मिळाला नाही, विकासासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही, आणि समस्यांचे निराकरण तर जवळजवळ शून्य! अशा परिस्थितीत प्रभागातील मतदार आता म्हमत आहेत “संजय मराठेनी गेल्या अनेक वर्षांत काय कामे केली ती आधी जाहीर करावीत; मगच मत मागावे!”

निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग 10 मध्ये बदलाची मागणी प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. नागरिकांचा रोष, वारंवार केलेल्या वचनभंगामुळे पसरलेली निराशा, आणि विकासासाठी नव्या नेतृत्वाची उमेद या सर्वांचे एकत्रित चित्र पाहता प्रभागातील राजकीय समीकरणे स्पष्ट दिसत आहेत. प्रभाग 10 मध्ये एकच चर्चा रंगते “आता नाही चालणार नावावरची सत्ता… यावेळी मत मिळणार ते काम करणाऱ्यालाच!” आणि याच कारणाने मनीषा संजय मराठे यांच्या पराभवाचे संकेत आधीच स्पष्ट दिसत आहेत.

सविस्तर पुढे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!