प्रभाग क्रमांक 3  किरण भाऊ बहारेंनां मिळतोय भक्कम प्रतिसाद, भरत ललवाणींच्या पराभवाचा काउंटडाऊन सुरू!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 3  किरण भाऊ बहारेंनां मिळतोय भक्कम प्रतिसाद, भरत ललवाणींच्या पराभवाचा काउंटडाऊन सुरू!

 

अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजकीय तापमान अक्षरशः उसळले आहे. आणि या उसळत्या वातावरणात एकच नाव प्रचंड दणक्यात घुमत आहे किरण भाऊ बहारे. हा प्रभाग म्हणजे त्यांचा बालेकिल्ला, आणि यंदा या बालेकिल्ल्याची भिंत अधिकच मजबूत झाल्याचे चित्र आहे. जनतेशी नाती मनाने जपणारा, प्रत्येकाच्या सुख:दुखाच्या प्रसंगात निर्भीडपणे धावून येणारा हा नेता प्रभागाच्या हृदयात घर करून बसला आहे. इतके की अनेक ठिकाणी लोकांचे स्पष्ट शब्द ऐकू येतात.

“इलेक्शन नाही, हा तर किरण भाऊंचा सिलेक्शन आहे!”

याउलट भरत ललवाणी यांच्याबद्दल नागरिकांमध्ये उफाळलेला राग आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे.

गाडीतून उतरून पाच वर्षांत प्रभागात एकदासुद्धा न फिरवणारा नेता निवडणुकीच्या तोंडावर अचानक जागा होतो, ही गोष्ट प्रभागाला अजिबात रुचलेली नाही. सिंधी कॉलनीतील आगीत लोकांना आधार देण्याऐवजी फोटोसेशन करून बातम्यांत चेहरा झळकवण्याचा प्रयत्न.. याने लोकांच्या मनात पेटलेली नाराजी आता रोषात बदलली आहे. दरम्यान, किरण भाऊ बहारे यांच्या पाठीशी संपूर्ण समाजधारा एकवटत आहे. गावात, गल्लीमध्ये, चौकात जिथे दृष्टी जाते तिथे लोक त्यांच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसतात. महिलांचा विश्वास, तरुणांचा जोश, ज्येष्ठांचा आशीर्वाद या सर्वांचा संगम म्हणजे किरण भाऊंची ताकद. त्यांच्या दारासमोर सतत लागलेली जनतेची रांग हा प्रभागातील बदलाचा पुरावा आहे. प्रचार सुरू होताच नागरिक स्वतःहून धावत येऊन म्हणत आहेत “या प्रभागाला खरा सेवक हवा. आणि तो म्हणजे किरण भाऊ!” आजची स्थिती एकदम स्पष्ट असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेचा बोलका रोष आणि किरण भाऊंची वाढती लोकप्रियता पाहता भरत ललवाणी यांच्या पराभवाचा टाळता न येणारा काउंटडाऊन सुरू झाला आहे. राजकीय विश्लेषक वा सामान्य मतदार सर्वांचाच सूर एकच…“यंदाची निवडणूक नाही, जनतेचा निकाल आधीच लागला आहे. प्रभाग 3 मध्ये धडाक्यात विजय मिळवणारे किरण भाऊ बहारेच!”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!