प्रभाग क्र. 1 ब कैलास नामदेव पाटील यांच्या उमेदवारीने राजकीय गणिते ढवळून निघाली
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जवळ येताच प्रभाग क्रमांक 1B मध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय गटांनी आपापली गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी लोकांच्या मनात आधीच एक नाव ठामपणे घुमू लागले आहे कैलास नामदेव पाटील. साधा, सरळ, जमिनीवरचा आणि नेहमी उपलब्ध असणारा हा माणूस वर्षानुवर्षे प्रभागातील विश्वासाचा केंद्रबिंदू बनला आहे.
राजकारणात रंगत आणणाऱ्या चर्चांमध्ये एकच वाक्य ठळकपणे ऐकू येते “इथं ना हिंदू ना मुस्लिम… इथं फक्त कैलास तात्या!”
‘शिलाई मशीन’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून, त्यातही एक अर्थ दडलेला आहे. घराघरातील गरजा, महिलांच्या स्वावलंबनाचा मुद्दा, आणि प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला उभं करणारी तात्यांची वर्षानुवर्षांची धडपड हे सर्व या चिन्हात जणू प्रतिबिंबित होते. कैलास पाटील यांनी कोणत्याही वर्ग, जाती किंवा समाजाच्या चौकटीत अडकून न राहता सर्वांना समान भावनेने साथ दिल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रभागाचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे.निवडणुकीच्या तोंडावर तात्या कोणतेही फोडाफोडीचे राजकारण न करता, थेट जनतेच्या मनात जाणाऱ्या त्यांच्या व्यवहारिक शैलीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, गटार व्यवस्थापन, महिलांसाठी सुरक्षा आणि रोजगार या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने लोकांचे प्रश्न हाताळले आहेत. त्यामुळेच आज प्रभाग 1 मध्ये वातावरण एकच सूर देत आहे: कैलास तात्यांची शिलाई मशीन यंदा विकासाचा नवा धागा विणणार!