प्रभाग 15 प्रशांत भाऊ निकम यांना कॉर्नर सभेतुन मिळतोय प्रचंड प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 15 प्रशांत भाऊ निकम यांना कॉर्नर सभेतुन मिळतोय प्रचंड प्रतिसाद

प्रभाग क्रमांक 15 मधून जनतेच्या सतत संपर्कात राहणारा, प्रत्येक घरात ओळखीचा आणि प्रत्येक समस्येत धावून येणारा कार्यकर्ता म्हणजे प्रशांत भाऊ निकम. गेली अनेक वर्षे कोणत्याही पदाशिवाय लोकांच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या निकम यांच्या प्रामाणिक सेवाभावामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रभागातून जबरदस्त प्रतिसाद उमटताना दिसत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांनी स्वयंप्रेरणेने त्यांच्या पाठीशी उभे राहत, “यावेळी प्रशांत भाऊच!” असा नारा दिल्याने प्रभागातील वातावरण तापले आहे.

स्थानिक समस्या, तरुणांचे प्रश्न, महिला सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा या प्रत्येक मुद्द्यावर प्रशांत निकम यांनी सातत्याने काम केले आहे. “24 × 7 उपलब्ध असणारा माणूस कोण?” असा प्रश्न विचारला तर नागरिकांच्या तोंडी एकच नाव येते प्रशांत भाऊ निकम. याच कार्यतत्परतेमुळे आणि जनसेवेच्या भावनेमुळे प्रभागातील सर्वच स्तरांवरून त्यांना मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत आहे. नियमित घरभेटी, प्रत्यक्ष संवाद आणि सोडवणुकीचा ठोस दृष्टिकोन यामुळे लोकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.

निवडणुकीची चाहूल लागताच प्रभाग 15 मध्ये एकच चर्चा रंगलीय यांवेळी प्रभागाला खर्‍या अर्थाने विकासाचा मार्ग दाखवणारा नेता हवा, आणि तो म्हणजे प्रशांत निकम. जनतेचा हा स्फूर्तिदायक पाठिंबा पाहता, प्रभागात बदलाची लाट स्पष्ट जाणवते आहे. प्रत्येक गल्लीत, चौकात आणि समाजात एकच भावना प्रशांत भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रभाग 15 चा सर्वांगीण विकास वेगाने होईल. आणि त्यामुळेच या निवडणुकीत निकम यांची उमेदवारी प्रभागाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी झणझणीत चर्चा शहरभर पसरत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!