प्रभाग 13 प्रवीण महाजन यांच्या उमेदवारीने अनेकांचे राजकीय गणिते कोसळण्याच्या तयारीत..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 13 प्रवीण महाजन यांच्या उमेदवारीने अनेकांचे राजकीय गणिते कोसळण्याच्या तयारीत..

 

प्रभाग क्रमांक 13 मधून जनतेच्या सतत संपर्कात राहून विश्वास जिंकणारे प्रवीण महाजन आता प्रभागातील चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. सामान्य घरातील, साध्या स्वभावाचे पण स्पष्ट दृष्टिकोन असलेले प्रवीण महाजन अनेक वर्षांपासून लोकांच्या सुख-दुःखात सहभागी राहिले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यशैलीमुळे प्रभागातील गणितीय आकडेमोड बदलू लागली असून, या वेळेस मतदार ‘जनतेत मिसळणाऱ्या’ नेतृत्वालाच पसंती देणार यात शंका नाही.

दुसरीकडे, वर्षानुवर्षे पदांचा आस्वाद घेतलेल्या आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावरच जनतेशी संपर्क साधणाऱ्या नेत्यांविषयी नागरिकांमध्ये नाराजी स्पष्टपणे व्यक्त होत आहे. लोकांची खरी गरज, त्यांचे प्रश्न आणि त्यावरचे तातडीचे उपाय यापासून दुरावलेल्या जुन्या नेतृत्वाला आता मतदारांनी कठोर संदेश देण्याचे ठरवले आहे. “वेळ आली की जनता विसरत नाही” अशी चर्चा गल्लीबोळात रंगताना दिसते असून, या वेळी अशा नेत्यांना प्रभागातून हद्दपार केले जाईल याबाबत जनमत ठाम आहे.प्रभागाला आता नवीन नेतृत्वाची गरज असल्याचा एकमताने सूर उमटत आहे आणि यासाठी प्रवीण महाजनांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. त्यांची जमिनीवरची काम करण्याची पद्धत, नागरिकांशी दररोजचा संपर्क आणि समस्या सोडवण्याची तत्परता यामुळे तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वर्ग उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत प्रभाग 13 च्या राजकीय समीकरणात मोठा बदल होईल आबू ने घरी बसून आराम करावा आणि या बदलाचे नेतृत्व प्रवीण महाजन करतील, अशी चर्चा सुरू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!