प्रभाग क्रमांक 13 सुनील दयाराम महाजन यांच्या उमेदवारीला महिलांचा वाढता प्रतिसाद
प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करताच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले पोलीस अधिकारी सुनील दयाराम महाजन आता समाजजागृतीच्या रणांगणात बॅट हातात घेऊन उतरले आहेत. शांत स्वभाव, लोकांशी जोडलेली शैली आणि समस्यांवर थेट उपाययोजना करण्याची वृत्ती यामुळे त्यांची उमेदवारी प्रभागात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह ‘बॅट’ नागरिकांना खूपच भावत असून, आगामी निवडणुकीत महाजन यांची बॅटिंग दमदार होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महिलांची सुरक्षा, तरुणांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची उभारणी, प्रभागातील नियमित पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत व महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत सुनील महाजन यांनी स्पष्ट विकासनिश्चय जाहीर केला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या अडचणी कशा सोडवायच्या याचे ठोस आराखडे ते मांडू लागले आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न कार्यपद्धतीमुळे तरुण वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.गेल्या काही दिवसांत महाजन यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रभागातील बदलाची चाहूल देणारा मानला जात आहे. पहाटेपासून उशिरा पर्यंत प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन जनसंपर्क करणारे सुनील महाजन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. “बॅट” चिन्हावर मतदान करून विकासाच्या या नवीन ध्येयवेळ्याला बळ द्या, असे आवाहन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाजन यांची उमेदवारी आता खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व उभे करणार, अशी चर्चा रंगताना दिसते.