December 10, 2025 5:45 am

कामगारांसाठी मोठी खुशखबर! चार नवे श्रम संहिता देशभर लागू; ग्रॅच्युइटीच्या नियमांतही मोठा बदल

अपनी भाषा में पढ़े! Translate

कामगारांसाठी मोठी खुशखबर! चार नवे श्रम संहिता देशभर लागू; ग्रॅच्युइटीच्या नियमांतही मोठा बदल

नवी दिल्ली/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी आज देशभरात चार नवे श्रम संहिता लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रम सुधारणा अखेर अमलात येत असून, कामगारांचे हक्क बळकट करणे आणि उद्योगांच्या कामकाजाला गती देणे हा सरकारचा उद्देश आहे.

🟤चार नवीन श्रम संहिता एकाच वेळी लागू

या संहितांमध्ये खालील चार कायद्यांचा समावेश आहे—

1. वेजिस कोड 2019

2. इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020

3. सोशल सिक्युरिटी कोड 2020

4. ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020

एकूण 29 जुने आणि किचकट श्रम कायदे एकत्रित करून ही चार संहिता तयार करण्यात आल्या आहेत.

🟢कामगारांसाठी मोठे बदल

मांडवीय यांनी सांगितले की, नव्या नियमांमुळे—

1. वेळेवर किमान वेतनाची हमी

2. युवकांना नियुक्तिपत्र देणे बंधनकारक

3. महिलांना “समान कामासाठी समान वेतन”

4. 40 कोटींपेक्षा अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा

5. एका वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटीचा लाभ

6. 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी

7. ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन

तसेच धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी 100% आरोग्य सुरक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

🟣ग्रॅच्युइटी नियमातील मोठा बदल

आतापर्यंत ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी ५ वर्षे सलग सेवा आवश्यक होती.
नवीन संहितेनुसार फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी फक्त १ वर्ष सेवा केल्यानंतरही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरणार आहेत.

हा नियम कारखाने, खाणी, ऑइल फील्ड, बंदरे व रेल्वे यांसारख्या क्षेत्रांत लागू होणार आहे.

🔴नवा नियम कधी लागू होणार?

कंपन्यांना नव्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी सुमारे 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की ग्रॅच्युइटीचा नवा नियम येत्या नववर्षापासून लागू होऊ शकतो.

मांडवीय यांनी या सुधारणा “ऐतिहासिक पाऊल” असल्याचे सांगून, नव्या संहितांमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत 2047’ या सरकारच्या ध्येयाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!