प्रभाग 16-अ मध्ये राजेश बापू पाटील यांची जोरदार चर्चा; प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त औक्षण

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 16-अ मध्ये राजेश बापू पाटील यांची जोरदार चर्चा; प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त औक्षण

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16-अ मध्ये एकच नाव जोरदारपणे पुढे येत आहे राजेश बापू पाटील. साधेपणा, नम्र वागणूक आणि लोकसंग्रहाची विलक्षण क्षमता यामुळे राजेश बापू यांच्या प्रचाराला प्रभागात अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावर दिसला की कोणाचाही हात धरून थांबणारा, प्रत्येकाशी अगत्याने विचारपूस करणारा हा “सामान्य माणसातला नेता” म्हणून त्यांची ओळख घट्ट होत आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांकडून राजेश बापूंचे पारंपरिक उत्स्फूर्त औक्षण होत असल्याचे दृश्य प्रभागात सर्वत्र पाहायला मिळत आहे. “आपला माणूस… आपल्यातला माणूस!” अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली असून घराघरातून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. अनेक ज्येष्ठ, महिला आणि तरुण मतदार त्यांच्याशी थेट संवाद साधतांना दिसत आहेत. “आमच्या भागात नेहमी उपलब्ध राहणारा नेता हवा, आणि तो म्हणजे राजेश बापू,” अशी खुली प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. राजेश बापू पाटील यांनी वर्षानुवर्षे प्रभागात केलेल्या शांत, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कामाचा परिणाम आता मतदारांच्या विश्वासात स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, विनम्र स्वभावामुळे आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या वृत्तीमुळे प्रभाग 16-अ मध्ये निवडणुकीची मोठी लाट त्यांच्या बाजूने फिरताना दिसते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!