प्रभाग 1 मध्ये ‘शिलाई मशीन’ची जोरदार चर्चा; कैलास पाटीलच पलटणार बाजी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 1 मध्ये ‘शिलाई मशीन’ची जोरदार चर्चा; कैलास पाटीलच पलटणार बाजी!

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये नव्या चर्चेचा वादळ उठले आहे ते म्हणजे कैलास नामदेव पाटील (तात्या) यांच्या दमदार एंट्रीमुळे! महाविकास आघाडीने उमेदवारी देताना झालेल्या अन्यायामुळे साने नगर, रामवाडी, बंगाली फाईल, तांबापुर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आता एका दिशेने वाहू लागली आहे, आणि ती दिशा आहे अपक्ष उमेदवार कैलास तात्यांच्या शिलाई मशीनकडे.

तात्या पाटील यांना मिळालेले ‘शिलाई मशीन’ हे निवडणूक चिन्ह त्यांच्या प्रचारात नवीच उर्जा घेऊन आले आहे. प्रभागभर एकच चर्चा“ही शिलाई मशीन फक्त चादरी शिवणार नाही… तर अनेक वर्षांचे फाटलेले प्रश्न, अडचणी आणि अन्याय शिवून नव्या विकासाची चादर पसरवणार!” स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक तात्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या तात्यांची प्रतिमा ‘भरोसेमंद स्थानिक नेतृत्व’ अशी निर्माण झाली आहे. परिसरात तात्यांच्या प्रचाराचा वेग वाढत असून मतदारांनीही स्पष्ट संकेत दिले आहेत“या वेळी निर्णय आमचा… आणि साथ तात्यांची!” कार्यकर्त्यांचा जोश, नागरिकांचा विश्वास आणि शिलाई मशीनचे प्रतीकात्मक वजन यामुळे प्रभाग 1 मध्ये निवडणुकीची बाजी पलटण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!