मुलांचे,मुलींचे प्रेमविवाह रजिस्ट्रेशन साठी पालकांची सम्मत्ती आवश्यक अमळनेर तहसीलदार अमळनेर यांना दिले निवेदन.

अमळनेर : विक्की जाधव.
आज तरूण मुले आणि मुली घरातून पळून जात आहेत.आणि आई बाबांच्या विना परवानगी शिवाय, विनाउपस्थिती शिवाय परस्पर लग्न करून घेतात.हे चुकीचे आहे.कुंटुंब व्यवस्था बरबाद करणारे आहे. प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हेगारी कृत्य बाहेर येताना महाराष्ट्र राज्यात आपण बघितलेले आहे. प्रेमाच्या नावाखाली अनेक प्रेम प्रकरणात कितीतरी लोकांना जीव गमावावा लागलेला आहे. म्हणूनच समाजात.

जेंव्हा अशी मुले मुली पकडली जातात, किंवा परत येतात, तेंव्हा ते जन्मदाते आई बाबांना पोलिसांसमोर मी ओळखत नाही असे म्हणत कायद्याला पुढे करून चक्क नाकबूल करतात.खूप दुःख होते. मुले ,मुली तरुण झाली तरीही ती जर अविचारी कृत्य करीत असतील, सामाजिक, कौटुंबिक प्रतिष्ठा पायदळी तुडवत असतील तर कायदेशीर बंधन आणणे आवश्यक आहे. आई बापाच्या गैरहजेरीत लग्न रेकॉर्ड करणे बेकायदेशीर ठरले पाहिजे. फक्त लग्न करणे हेच सरकारचे काम नाही तर लग्न सुद्धा कौटुंबिक आणि सामाजिक परंपरा धरून असले पाहिजे.ज्यात दोन्ही कडील आई बापाची सम्मत्ती असणे आवश्यक केले पाहिजे.

भारतीय राज्यघटनेतील शपथ आहे कि,”मला भारतीय परंपराचा अभिमान आहे .” जर सरकार ही परंपरा मोडीत काढत असेल तर ते घटना विरोधात आहे.सरकारने घटनेचे पालन केले पाहिजे.परंपरा मोडीत काढू नये.परंपरा हिच मानवी जिवनाची संस्कृती आहे. म्हणून आम्ही सामाजिक भान ठेवून असा कायदा करण्याची मागणी करीत आहोत.”आई बापाच्या उपस्थितीतच आणि अनुमती शिवाय मुला मुलींचे लग्न कायदेशीर ठरवु नये.” धर्मांतर कायदा बनवताना अशी अट सरकार ने घातली आहे.

तर मग लग्न करताना सुद्धा अशी अट घातलीच पाहिजे. आई बापाच्या उपस्थिती आणि अनुमती शिवाय मुला मुलींचे लग्न कायदेशीर ठरणार नाही.” राजस्थान विधानसभेत याबाबत आमदार महोदयांनी चर्चा केली.कारण ती काळाची गरज आहे.अन्यथा कुटुंब व्यवस्था टिकणार नाही.म्हणून मुलगा किंवा मुलीचे लग्न रजिस्ट्रेशन करताना दोघांचे आई बाप, पालक उपस्थित असणे आणि त्यांची सम्मत्ती असणे आवश्यक केले पाहिजे. त्यासाठी आम्ही भारत जागृत मंच मार्फत लोकसभा, विधानसभा, विभागीय आयुक्त, नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, प्रांत अधिकारी, वरील सर्वांना विनंती करून अति तातडीचे विधेयक मंजूर करण्यासाठी अमळनेर तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.