भिगवण : प्रसिद्ध सागर हॉटेलमधील अस्वच्छतेवरून ग्राहकांची नाराजी; व्यवस्थापन म्हणाले – “नक्कीच काळजी घेऊ”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-17 at 9.04.43 AM

भिगवण : प्रसिद्ध सागर हॉटेलमधील अस्वच्छतेवरून ग्राहकांची नाराजी; व्यवस्थापन म्हणाले – “नक्कीच काळजी घेऊ”

(निलेश गायकवाड)

भिगवण (प्रतिनिधी) – भिगवण शहरातील एकेकाळचे सर्वाधिक पसंतीचे आणि उत्तम नाश्त्यासाठी ओळखले जाणारे सागर हॉटेल सध्या ग्राहकांच्या तक्रारींमुळे चर्चेत आले आहे.

भिगवण व परिसरातील नागरिकांचे आवडते ठिकाण असलेल्या या हॉटेलमध्ये सध्या स्वच्छतेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा नाश्ता दिला जात असल्याची तक्रार समोर आली आहे.

याबाबत भिगवण येथील तक्रारदार श्री. अनिकेत भिसे यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, “सागर हॉटेलमध्ये सध्या स्वच्छतेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा दिसत आहे. नाश्त्याचा दर्जाही पूर्वीसारखा राहिलेला नाही. ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे.”

या तक्रारीनंतर आमच्या प्रतिनिधीने हॉटेल व्यवसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

हॉटेल व्यवसायिकांचे म्हणणे –
तक्रारीची दखल घेत हॉटेल व्यवस्थापकांनी सांगितले की, “ग्राहकांनी केलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो. स्वच्छतेच्या बाबतीत काही त्रुटी राहिली असेल तर ती त्वरित दूर केली जाईल. यापुढे आम्ही नक्कीच काळजी घेऊ आणि ग्राहकांना उत्तम व स्वच्छ सेवा देऊ.”

व्यवस्थापनाने दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे हा वाद आता मिटण्याची चिन्हे असून, सागर हॉटेल पुन्हा एकदा आपल्या जुन्या लौकिकाला साजेसे काम करेल अशी आशा भिगवणकर व्यक्त करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!