पातोंड्यात महिलेचा विनयभंग आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील पातोंडा गावात महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, आरोपीविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा येथील एक महिला शौचास जात असताना अरुण दौलत संदानशिव हा रस्त्यावर आला आणि त्या महिलेला अडवून तिचा हात धरला. त्यानंतर अपशब्द वापरून तिचा विनयभंग केला. महिलेनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि “जर कुणाला सांगितलंस तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पसार झाला.घरी परतल्यानंतर महिलेनं आपली व्यथा पती आणि जेठानीला सांगितली. त्यांनी तत्काळ अमळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी अरुण संदानशिव याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी व अपशब्दांच्या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल केला आहे.