“मार्मिक”चा दणका.. अमळनेर नगरपालिकेची तत्काळ कारवाई! शहरातील अनधिकृत बॅनर्स हटवले
नागरिकांत समाधान, काही ठिकाणी अजूनही कार्यवाहीची प्रतीक्षा…

अमळनेर : विक्की जाधव.
“अमळनेर शहरात नाधिकृत बॅनर्सने गुदमरतोय अमळनेरकरांचा श्वास!” ही मार्मिक समाचारने प्रकाशित केलेली बातमी प्रशासनाच्या कानावर पोहोचताच अमळनेर नगरपरिषदेने तात्काळ दखल घेतली. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बॅनर्स व फलक हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः अतिक्रमण पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी उभे राहून सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, सुभाष चौक, स्टेशन रोड, तिरंगा चौक आणि बसस्थानक परिसरातील बॅनर्स उतरवण्याचे काम सुरू केले. काही ठिकाणी तर मोठमोठे बॅनर्स व पोस्टर्स उभे राहिले होते, ज्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहनांना जाण्यासही अडचणी येत होत्या. बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्हीचे देखील नुकसान झाले होते. अखेर प्रशासनाच्या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नागरिकांनी या बातमीचे स्वागत करत “मार्मिक समाचारची बातमी खरच असरदार ठरली” अशी प्रतिक्रिया ही दिली. शहरातील बॅनरबाजीमुळे अलीकडेच सौंदर्य आणि स्वच्छतेवर परिणाम होत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली होती. काहींनी सोशल मीडियावर याविषयी संतापही व्यक्त केला होता.
“तथापि, शहरातील काही भागांत अजूनही काही बॅनर्स शिल्लक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्ण शहरातून अवैध बॅनर्स हटवून कायमस्वरूपी नियमावली तयार करावी, अशी मागणी आता होत आहे”.
“मार्मिक समाचार”च्या प्रभावी पत्रकारितेमुळे प्रशासनाला जाग आली, आणि नागरिकांना दिलासा मिळाला हा खऱ्या अर्थाने जनतेचा विजय आणि निर्भीड पत्रकारितेचा प्रभाव म्हणावा लागेल!
पत्रकार: विक्की जाधव
