खान्देश म्युझिक सर्कलचे सहावे संगीत संमेलन उत्साहात संपन्न..

अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव खान्देशातील शास्त्रीय संगीत साधकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरलेले खान्देश म्युझिक सर्कलचे सहावे संगीत संमेलन यावर्षीही उत्साहात पार पडले.

के.सी.ई. सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांच्या सहकार्याने हे संमेलन १ आणि २ नोव्हेंबर रोजी पार पडले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात खान्देश तसेच पुणे, मुंबई, वडोदरा येथील एकूण २५ गायक-वादकांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

समारोप प्रसंगी संचालक श्री. शशिकांत वडोदकर यांनी सर्व कलावंतांचे कौतुक करत संमेलन यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. योगेश संदानशिव, श्री. आशिष राणे, श्री. हरीश भावसार आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरलेले हे संमेलन खान्देशातील कलावंतांना नवचैतन्य आणि प्रेरणा देणारे ठरले.
