अमळनेरात अभिजातचा अभिजय! मराठी वाङ्मय मंडळाच्या त्रिवार्षिक निवडणुकीत डॉ. अविनाश जोशी यांच्या पॅनेलचा विजय

अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील साहित्यिक चळवळ पुढे नेणाऱ्या प्रतिष्ठित मराठी वाङ्मय मंडळाच्या त्रिवार्षिक निवडणुकीत डॉ. अविनाश जोशी यांच्या अभिजात मराठी पॅनेलने विजयाची पताका फडकावली. साहित्यप्रेमी व वाचकवर्गात या निवडणुकीची चांगलीच चर्चा होती.
विजयी उमेदवार:
अध्यक्ष – डॉ. अविनाश जोशी (अभिजात) तर उपाध्यक्ष – डॉ. रवींद्र कुलकर्णी (परिवर्तन), विवेकानंद भांडारकर (परिवर्तन) कार्यवाह – प्रा. शाम पवार (अभिजात), भैय्यासाहेब मगर (अभिजात), प्रदीप साळवी (परिवर्तन) यांची निवड झाली असून कोषाध्यक्षपदासाठी उदय देशपांडे (परिवर्तन) आणि प्रा. सुरेश माहेश्वरी (अभिजात) यांना समान मते मिळाल्याने त्यांची चिठ्ठीद्वारे दोघांनीही दीड-दीड वर्ष कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरवले, तर कार्यकारिणी सदस्यपदी – वसुंधरा लांडगे, डॉ. महेश रमण पाटील, स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, प्रा. विजय तुंटे, संदीप घोरपडे (अभिजात) तसेच कांचन शाह व सोमनाथ ब्रम्हे (परिवर्तन) विजयी झाले. तसेच ऍड. के. व्ही. कुलकर्णी आणि अनिल सोनार (परिवर्तन) यांना समान मते मिळाल्याने त्यांनीही चिठ्ठीने दीड-दीड वर्षे कार्यकाळ वाटून घेतला आहे.

या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब देशमुख, विजय बोरसे आणि दिनेश नाईक यांनी पारदर्शकपणे काम पाहिले.
सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा : मार्मिक समाचार
