शिरपूर तालुक्यात गॅस व रेशनचा काळाबाजार; रेशनकिंग व अधिकारीच मालामाल, जनता कंगाल…

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर तालुक्यात गॅस व रेशनचा काळाबाजार; रेशनकिंग व अधिकारीच मालामाल, जनता कंगाल…

शिरपूर तालुक्यात गॅस सिलेंडर आणि रेशनचा काळाबाजार पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. “रेशन किंग” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही व्यापाऱ्यांचा प्रभाव इतका प्रबळ झाला आहे की पुरवठा विभाग, तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि अगदी कलेक्टरपर्यंत कोणीही उघडपणे कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही.
आज रेशनच्या रांगेत उभा राहिलेला गरीब नागरिक आपल्या हक्काच्या धान्याची भीक मागत आहे. सबसिडीच्या गॅस सिलेंडरऐवजी त्याच्याच समोर खुले दर आकारले जात आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता मध्यस्थांच्या खिशात जात आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अधिकारी आणि रेशनकिंग संगनमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “नार्कोटेस तपासणी” म्हणजेच संपत्ती आणि व्यवहार तपास केला गेला तर अनेक प्रकरणांचा पर्दाफाश होऊ शकतो, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. काही ठिकाणी ग्राहकांना सबसिडीच्या दरात सिलेंडर न देता खुल्या बाजारातील दर आकारले जात असल्याचेही उघड झाले आहे.

या सर्व प्रक्रियेमुळे जनतेचा आत्मविश्वास प्रशासनावरून डळमळीत झाला आहे. एकीकडे महागाई आणि बेरोजगारीने लोकांच्या आर्थिक स्थितीचा चांगलाच कोंडमारा केला आहे, तर दुसरीकडे या लुटमारीने जिवाचे वैताग वाढवले आहेत. रेशन मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते, पण अखेरीस त्यांना दिले जाणारे प्रमाण आणि गुणवत्ता अत्यंत गैरसोयीचे ठरते.

दरम्यान, या घडामोडींवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जनतेची मागणी आहे की शासनाने तातडीने विशेष चौकशी समिती नेमावी आणि दोषी अधिकारी व व्यापारी यांच्या संपत्तीची चौकशी करून कठोर कारवाई करावी.

लोकांच्या मूलभूत गरजांवर कोणीही मक्तेदारी गाजवू शकत नाही, आणि प्रशासन जर सजग झाले नाही तर नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!