शिव सेना ठाकरे पश्चिम विभाग शहर प्रमुख पदासाठी निष्ठावंत शिवसैनिक सुरेश पाटील यांना पाठिंबा
उल्हासनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पश्चिम विभागासाठी शहर प्रमुख पदासाठी निष्ठावंत शिवसैनिक सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. सुरेश पाटील व मंगला पाटील हे उल्हासनगर शिवसेनेत कित्येक वर्षे सक्रिय असून ठाकरे सेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.
सुरेश पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या गद्दारी नंतर उल्हासनगर कॅम्प दोन मधील खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडण्याचे धाडस दाखवून शिंदे गटाला पहिला हादरा दिला होता. याचा बदला घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे सुरेश पाटील यांच्यावरील राजकीय स्वरूपाचे गुन्हे दर्शवून तडीपारीचे आदेश बजावले होते. सुरेश पाटील यांनी शिंदे यांच्या दबाव तंत्रापुढे न झुकता दीड वर्षे तडीपारी भोगली परंतू निष्ठा बदलली नाही.
या तडीपारीच्या काळात न डगमगता त्यांची पत्नी सौ. मंगला सुरेश पाटील यांनी गृह कर्तव्ये पार पाडून शिवसेना सेना महिला आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःला झोकून दिले.
उल्हासनगर पश्चिम परिसरात शिव सेना वाढवण्यात सुरेश पाटील सक्रिय होते. गेली 30-35 वर्षे ते शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 2017 च्या निवडणुकीत मंगला पाटील यांचा 69 मतांनी निसटता पराभव झाला तरी त्यांनी शिव सेनेच्या माध्यमातून प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला व आपली समाजसेवा सुरू ठेवली. या विभागातून यापूर्वी राजेंद्रसिंग भुल्लर, पिंकी भुल्लर व कुलवंतसिंग बैस यांनी पक्षाचे नेतृत्व केले. यातील राजेंद्रसिंग भुल्लर हे शिंदे गटात सुरुवातीसच सामील झाले. याच वर्षी जानेवारीत नेमलेले कुलवंत सिंग बैस यांनी गेल्याच आठवड्यात गद्दारी करून भाजपात दाखल झाले.
त्यामुळे गेली 30-35 वर्षे निष्ठेने सक्रिय शिवसैनिक असलेले व पक्षासाठी तडीपारी भोगूनही निष्ठा ढळू दिली नाही अश्या सुरेश पाटील यांना शहरप्रमुख पदी नियुक्ती करावी, अशी ज्येष्ठ शिवसैनिकांसह स्थानिक जनतेची मागणी आहे.