निर्दयीपणे गुरांची वाहतूक अमळनेरमध्ये मिनीट्रक पकडला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

निर्दयीपणे गुरांची वाहतूक अमळनेरमध्ये मिनीट्रक पकडला; चालकाविरुद्ध गुन्हा दाख

अमळनेर : विक्की जाधव 

बेकायदेशीर गुरांची वाहतूक करत असल्याचा प्रकार अमळनेर परिसरात उघडकीस आला आहे. मिनीट्रकमधून गुरे कोंबून बेटावद हून जळगावकडे नेत असताना गोरक्षकांनी चालकाला पकडले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मिनीट्रकमधील तीन गुरे व वाहन असा सुमारे २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी चालकाची ओळख तुषार संतोष पाटील (वय ३४, मालपूर, दौडाईचा) अशी असून मिळालेल्या माहितीनुसार, गोरक्षक पुरूषोत्तम व दिनेश माळी हे अमळनेर-रस्ता परिसरात असताना त्यांनी संशयास्पद मिनीट्रक पाहिला. थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक वळवून बेटावदच्या दिशेने पळ काढला. गोरक्षकांनी पाठलाग करून बेटावद येथील मंदिराजवळ ट्रक पकडला.या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक व गुरे ताब्यात घेऊन आवश्यक तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!