शिरुड नाका परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ ८५ वर्षीय वृद्धावर हल्ला, नागरिकांत भीतीचे वातावरण

अमळनेर : विक्की जाधव
शहरातील शिरुड नाका परिसरात रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज पहाटेच रानडुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, ८५ वर्षीय गजानन आनंदा चौधरी हे दूध घेण्यासाठी जात असताना अचानक रानडुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ चौधरी यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले आहे. परिसरात काही नागरिकांवरही रानडुकरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक प्रशासनाकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. स्थानिकांनी वनविभाग व नगरपरिषदेचे लक्ष वेधून घेतले असून, “रानडुकरांचा बंदोबस्त न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते” असा प्रश्न उपस्थित केला.
