प्रवीण पाटील यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रवीण पाटील यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती

 

अमळनेर : विक्की जाधव 

वंदनिय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने प्रवीण पुरुषोत्तम पाटील (साने नगर) यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित राधेश्याम कोगटा यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून पक्षश्रेष्ठींनी दाखवलेली वाटचाल अंगाशी बाळगुण भविष्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्नशिल राहाल व सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास दाखवून वरिष्ठांनी प्रवीण पाटील यांची नियुक्ती केली आहे.

प्रवीण पाटील यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचा अमळनेर शिवसेना कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळा- एरंडोलचे आमदार अमोल पाटील, माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, वैद्यकीय सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी, तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, वैद्यकीय सेना तालुका प्रमुख प्रमोद शिंपी, माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, उपतालुका प्रमुख भूषण कोळी, व्यापारी सेना शहरप्रमुख अमित ललवाणी, तालुका संघटक गजेंद्र जाधव, प्रसिद्ध प्रमुख अनिल पवार, शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख शोएब शेख यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!