अंतुरली येथे कार्तिक स्वामींची भव्य यात्रा; जिल्ह्याभरातून होणार भक्तांची गर्दी.

अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिर, अंतुरली येथे यावर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनयोग साधला जात असून, परिसरातील भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मंदिर संस्थानच्या अध्यक्ष श्री. शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी सर्व भाविकांना दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्तिक पौर्णिमा दर्शनयोग:मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ उद्या रात्री १०:३६ पासून ते बुधवार, दि. ५ नोव्हेंबर सायंकाळी ६:४९ पर्यंत राहणार आहे.तर कृत्तिका नक्षत्र बुधवार, दि. ५ नोव्हेंबर सकाळी ६:३४ पासून ते रात्री ३:२८ पर्यंत असेल.या दोन्ही तिथी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अंतुरली गावात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, पालखी सोहळा आणि भक्तिगीतांचा सुरेल जल्लोष होणार आहे. मंदिर समितीच्या वतीने भक्तांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था, पाणी, आरोग्यसेवा आणि पार्किंगची सोय करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकही यात्रेच्या तयारीत व्यस्त आहेत.“सर्वांनी श्रद्धा, भक्ती आणि अनुशासनाने कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे,”
असे आवाहन अध्यक्ष शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी केले आहे.