अमळनेरचे विशाल चौधरी ठरले राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे विजेता!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरचे विशाल चौधरी ठरले राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे विजेता!

अमळनेर : विक्की जाधव 

अमरावतीत झालेल्या ‘चकाटे फोटो स्टुडिओ’ आयोजित स्पर्धेत खानदेशाचा लौकिक वाढविला.

अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनात अमळनेरचा तरुण छायाचित्रकार विशाल चौधरीने आपले कौशल्य दाखवत पहिला क्रमांक पटकावला. या यशामुळे अमळनेर तसेच संपूर्ण खानदेशाचा अभिमान वाढविणारा ठरला आहे.

ही स्पर्धा २८, २९ आणि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ‘चकाटे फोटो स्टुडिओ, अमरावती’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील छायाचित्रकारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.स्पर्धेत चार प्रमुख विभाग होते  उत्सव, वाइल्डलाइफ, वेडिंग आणि किड्स कॅटेगरी. यामध्ये अमळनेरच्या विशाल चौधरीने “किड्स” कॅटेगरीत पहिला क्रमांक मिळवला. यावेळी त्यानां मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक थोते, प्राचार्य बिरला सायन्स कॉलेज, तसेच अ.डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. राजेश चंदनपाट, सुनिता भोळे, मनोज आप्पा कपसे, पवनकुमार खाटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले असून, विजेत्यांचा गौरव करताना प्रमुख पाहुण्यांनी युवा छायाचित्रकारांना प्रोत्साहन दिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!