“बॅनर्सच्या जंगलात गुदमरतोय अमळनेर!” अनधिकृत बॅनरबाजीने शहराचे रूप विद्रूप; नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!
अमळनेर विक्की जाधव.
अमळनेर शहरात सध्या बॅनर्सचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कुणाचा बर्थडे असो, स्वागत असो किंवा राजकीय जाहिरात चौकाचौकात, वळणांवर आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत बॅनर्सचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे बॅनर्स लागले असून, सामान्य नागरिक, वाहनचालक आणि पादचारी यांचा श्वासच गुदमरू लागला आहे.

केवळ एवढंच नव्हे तर शहरातील महापुरुषांचे पुतळे, स्मारकं आणि सार्वजनिक ठिकाणं देखील या बॅनर्सच्या आड झाकली जात आहेत.बऱ्याच ठिकाणी नेत्यांचे फोटो महापुरुषांच्या फोटो वर फोटो असतो. महापुरुषांचे पवित्र स्मारक झाकलेले दिसतात, अण्णाभाऊ साठे च्या पुतळ्यापासून राष्ट्र संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकांपुढे “हॅपी बर्थडे”चे बॅनर लटकलेले दिसतात. हा प्रकार शहरातील सामाजिक जाणिवेला चाप लावणारा आहे. विशेष म्हणजे पत्रकारांनाही ह्या गोष्टीची जाण नसावी जनतेत संतापाची लाट आहे. याहून गंभीर म्हणजे, पोलीस स्टेशनने बसवलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरें या बॅनर्समुळे झाकले गेले आहेत काही ठिकाणी तर अक्षरशः बॅनर्स मुळे कॅमेरे तुटून पडले आहेत. परिणामी गुन्ह्यांची चौकशी, वाहतूक नियंत्रण आणि शहर सुरक्षेवर थेट परिणाम होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दोघेही गप्प बसलेले दिसतात.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना तर अमळनेरच्या विकासासंदर्भात कोणतेही देणे घेणे नाही. असे झाले आहेत.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील. यांच्या काळात पालिकेमार्फत अधिकृत बॅनर लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती, परंतु सध्याच्या काळात या नियमांची पायमल्ली केली जात आहे. ठेकेदार आणि राजकीय कार्यकर्ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “जागा मिळेल तिथं बॅनर” लावत आहेत.शहरातील दृश्य अक्षरशः बॅनर्सच्या गोंधळात हरवले आहे. नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.

“रस्ते अरुंद झालेत, कॅमेरे झाकलेत, अपघात वाढलेत, पण प्रशासन झोपेत आहे,” अशा शब्दांत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. अवैध बॅनर लावणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी होत असून सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा पेटली आहे.
