दोन गट, दोन भूमिका कुणी जोडे मारले तर कुणी केला दूधाभिषेक

अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील सात्री गावात शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः रोटर फिरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले सात्रीची, चर्चा संपत नाही. तो तालुक्यात चर्चाचा विषय ठरत आहे. गाव चार महिन्यांच्या घामानं उभ्या केलेल्या कापूस आणि मका पिकांवर काहींनी ट्रॅक्टर फिरवून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीचा सण आनंदाचा असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र निराशा आणि अश्रूंची कडवट चव भरली.

या घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम (काका) पाटील यांनी सात्री गावात पाच किलोमीटर पायी चालत जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या आणि प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. “शेतकऱ्याच्या मेहनतीचा घास कोणालाही हिरावण्याचा अधिकार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पुनर्वसन मुद्द्यावर बोलताना स्थानिक पुढार्यांना त्यांच्या शब्दात चांगलीच फटकेबाजी केली.

दरम्यान, या घटनेनंतर गावात दोन वेगवेगळ्या गटांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. वास= गावातील काही ग्रामस्थांनी संतापाच्या भरात शिवराम काका पाटील यांच्या फोटोला जोडे मारून आपला विरोध दर्शवला.

तर दुसरीकडे सात्री गावातील काही महिलांनी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत दुधाने अभिषेक करून त्यांचा सन्मान केला. दोन टोकांच्या या प्रतिक्रिया राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी रस्ता नको पुनर्वसन पाहिजे अशा घोषणा दिल्या.