“आता बळीनेच बळ धरून लढले पाहिजे!” सात्रीत शेतकऱ्यांसोबत शिवराम काका पाटील यांचा संवाद. आमदार अनिल पाटील यांच्यावर केले आरोप

अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील सात्री गावातील शेतकऱ्यांच्या आयुष्यावर अक्षरशः आघात झालाय! २००३ पासून सुरू असलेल्या पुनर्वसन प्रक्रियेला शासनाने अखेर मंजुरी दिली, नवी वसाहत तयार झाली,शाळा, बसस्टॉप, पाण्याची टाकी उभी राहिली, पण तरीही गाव आजही तसच बुडत्या अवस्थेत आहे. कारण एकच आमदार अनिल पाटील यांचा अडथळा! असे आरोप करत शिवराम काका पाटील म्हटले की. पत्र देऊन पुनर्वसन रोखले, आदेश असूनही लोकांना वेठीस धरले आणि ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या शेतावर रोटाव्हेटर फिरवून त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी भाग पडले.

कापूस आणि मका वेचणीला आला होता; मेहनती शेतकऱ्यांचा घास मातीत मिसळला असून गावात पोलिसांची दहशत, अधिकाऱ्यांचा मूक पायंडा, आणि भ्रष्ट राजकारणाचा उघड नाच सुरू आहे!

“या टोळीने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय,” असा संताप व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील म्हणतात
“मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील हे सर्वजण एकीकडे बळी राजाला हार घालतात आणि दुसरीकडे बळीसारख्या शेतकऱ्यांना चिरडतात. हा विनोद नाही, हा अन्यायाचा नंगानाच आहे!”

शिवराम काका पाटील पुढे म्हणतात “आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. बळीनेच स्वतःच्या अंगात बळ आणून लढले पाहिजे! कारण राज्यातील सत्ताधारी आता रावणाच्या मानसिकतेत वावरत आहेत. दिसले ते लुटणे, आडवे आले त्यांना संपवणे हीच त्यांची नीति!” सात्री गावातील शेतजमीन आज रणांगणासारखी दिसते. बाया-माणसं रडत आहेत, परंतु आवाज कुणाच्या कानावर पडत नाही. पत्रकार ही दुबळी भूमिका घेत आहेतच. असे ही तें म्हटले. बळी प्रतिपदेच्या दिवशी बळी राजाची पूजा करणाऱ्यांनी आज जिवंत बळींना होरपळून टाकलं आहे.
शेवटी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम काका पाटील म्हटले की.. सात्रीसारखं गाव पुन्हा जळगाव जिल्ह्यात कुठे होऊ नये! आता लढा द्यायचा, तो शेतकऱ्यांच्या सन्मानाचा.“बळीनेच बळ धरून लढले पाहिजे!”