December 10, 2025 4:48 am

मदनवाडीच्या पुलाखाली गर्भवती महिलेच्या कुजलेल्या अवस्थेत घावलेल्या मृतदेहामुळे खळबळ;घातपाताची शक्यता

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडीच्या पुलाखाली गर्भवती महिलेच्या कुजलेल्या अवस्थेत घावलेल्या मृतदेहामुळे खळबळ;घातपाताची शक्यता

(निलेश गायकवाड)

भिगवन ते बारामती या राज्य मार्गावरील मदनवाडी येथील पुलाच्या खाली एका महिलेचा अंदाजे वय 30 ते 35 वयोगटातील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व चादरीत गुंडाळून आढळून आला आहे. हा मृत्यू काल दिनांक 22 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारनंतर उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे सदरील महिला ही सात ते आठ महिन्याची गरोदर असल्याचे माहिती समोर येत आहे. गर्भवती असल्याने प्राथमिक दृष्टीने सदरील प्रकार पाहता खुणाचा प्रकार असल्याचे वाटत असून. त्यामुळे पुढील तपासासाठी भिगवण पोलिसांपुढे खूप मोठे शर्तीचे प्रयत्न असणार आहेत. भिगवण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. व पुढील तपास व यंत्रणा चालू झाली.

सदरील घटनेमध्ये महिला सहा ते सात महिन्यांचे गरोदर असल्याने तसेच तिला चादरीमध्ये गुंडाळून पुलाखाली अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी टाकण्यात आल्याने खूप मोठा संशय व्यक्त केला जात आहे. सदर महिलेची अजून ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यानंतर पुढील अधिकचा तपास भिगवण पोलिसांच्या वतीने होऊ शकतो.

तसेच महिलेची ओळख पटनासाठी महिलेच्या हातावरती Raviraj असे लिहिलेले आहे या आधारे भिगवण पोलिसांच्या वतीने परिसरामध्ये ओळख पटण्यासाठी माहिती गोळा केली जात आहे माहिती कोणाकडे आल्यास भिगवण पोलिसांना संपर्क करण्याची आव्हान देखील करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!