घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाहीत असे वक्तव्य करणार्या मिश्रा विरोधात दौंड संविधानस्तंभा समोर आंदोलन.
प्रतिनिधी -विकी ओहोळ
8446119158
दौंड -भारतातील अनेक शहरात महापुरुषांविषयी अपमानकारक,बेताल वक्तव्य केले जात आहे काही दिवसांपूर्वी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला गेला. अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण भारतात,महाराष्ट्रात आंबेडकरी विचारांचे पक्ष, संघटनांनी आंदोलन केले. दौंड शहरात सुद्धा सर्वच दलित संघटनांचे पदाधिकारी, मुस्लिम ,ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी तसेच भीम अनुयायी यांनी दलित संघटनांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनाला यावेळी निवेदन दिले.संपूर्ण देशात जातीय अत्याचार वाढले आहेत. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे सार्वजनिक रित्या बोलले जाते.यांचेवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई साठी अपेक्षित असलेले कलम लावलेले नाही. जातीयवादी प्रवृत्तीला कठोर शिक्षा करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोर या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात डागण्यात यावे,तसेच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांचा हस्तक म्हणणारे, त्यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या समाजकंटक अनिल मिश्रा, आनंद स्वरूप तसेच आरक्षणाला विरोध करणारे राम भद्राचार्य यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. संविधान स्तंभा समोर अनेक भिम सैनिकांनी अनिल मिश्रा या मनोरुग्णाला चपलेच्या हार घालून तसेच त्याच्याविषयी शाब्दिक राग व्यक्त करत अटक झालीच पाहिजे असे मागणी करण्यात आली,
यावेळी संविधानाला मानणारा वर्ग व मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी उपस्थित होते.