ग्रामसेवक आणि घरकुल अभियंतायांचे साठेलोटे मिळून घेतात ठेका, पगार आणि लाटतात शसनाचे अनुदान.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामसेवक आणि घरकुल अभियंतायांचे साठेलोटे मिळून घेतात ठेका, पगार आणि लाटतात शसनाचे अनुदान.

 

अमळनेर : विक्की जाधव.

पंचायत समितीत घरकुल योजनेंतर्गत मोठा घोटाळा उघडकीस येत आहे. पंचायत समितीतील घरकुल अभियंते हे शासनाच्या मानधनावर कार्यरत असताना, स्वतःच्या नावानेच एजन्सी चालवतात, एवढंच नव्हे तर त्या एजन्सीद्वारे ठेकेही घेतात! नोंदणी करताना १०० रुपयांच्या स्टँपवर स्पष्टपणे नमूद केलेले असते की “आम्ही शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाही”, तरीही हेच अभियंते शासनाचे मानधन घेत घरकुलाचे कमिशनही खिशात घालत असल्याची चर्चा जोरात आहे.

ग्रामसेवक आणि घरकुल अभियंते यांच्या या “साठेलोट्या” मुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. गावागावांत या गैरव्यवहाराची चर्चा रंगली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

शासनाचे नोकर ठेकेदार कसे झाले?

अमळनेर तालुक्यातील जनतेत आता प्रचंड संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. नव्हे तर मार्मिक या संदर्भात कोणाकोणाचे हात रंगेल आहेत याच सखोल छाडा लावणार आहे.

पुढील वृत्त लवकरच..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!