अमळनेर तालुका ‘ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानात’ अग्रेसर — प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख यांचे सुतोवाच
अमळनेर : विक्की जाधव.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष व मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ. अनिलजी देशमुख यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना सांगितले की, “ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका पुन्हा एकदा अग्रेसर ठरला असून, प्रांत स्तरावर जवळपास चार हजार सदस्यांनी सहभाग नोंदविला आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात सौ. गंगा अग्रवाल यांच्या स्वागत गीताने झाली. सौ. मनीषा भांडारकर यांनी पवित्र गणपती वंदना गायली, तर एड. भारती अग्रवाल यांनी संघटन मंत्र उच्चारला. स्वामी विवेकानंद आणि ग्राहक तीर्थबिंदू नाना जोशी यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पाचोरा येथील कार्यकर्त्या स्वर्गीय सौ. अरुणा उंटावंत व सौ. कपिला मुठे यांच्या जावई स्व. रोशन मोहिते यांच्या स्मृतीसुद्धा यावेळी आदरपूर्वक उजाळ्या देण्यात आला.
या प्रसंगी डॉ. अनिल देशमुख यांची प्रांत सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल-बुके देऊन मकसूद बोहरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात एड. सुभाष तायडे, सौ. निर्मला देशमुख, एड. देवेंद्र जाधव, एड. शिरीन अमरेलीवाला, सुधाकर पाटील, निलेश बडगुजर, गिरीश कुलकर्णी, बहिरम सर आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून देण्यात आला. प्रतिनिधिक स्वरूपात पाच नूतन सदस्यांचे – ज्येष्ठ पत्रकार-कवी सुभाष पाटील घोडगावकर, भाऊसाहेब देशमुख, पंकज चव्हाण, सौ. मनीषा भांडारकर आणि सौ. गंगा अग्रवाल – स्वागत करण्यात आले. तसेच डॉक्टर वेदांती सतीश देशमुख हिला पदवत्तर शिक्षणात मेरिटने प्रवेश मिळाल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल देशमुख यांनी अमळनेर ग्राहक पंचायतने ग्राहक हक्कांसाठी केलेल्या लढ्याचे आणि राज्यातील सर्वप्रथम महिला कार्यकारिणी स्थापन करण्याच्या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेल्या प्रयत्नांचेही विशेष उल्लेख केले.