अमळनेर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

 

अमळनेर : विक्की जाधव.

–जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर होताच तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध प्रभागांमध्ये आरक्षणाच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंचायत समिती आरक्षणानुसार, पातोंडा येथे अनुसूचित जाती (महिला), कळमसरे येथे अनुसूचित जमाती (महिला), डांगरी येथे अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), जानवे आणि दहिवद येथे खुले प्रभाग, अमळगाव आणि मांडळ येथे नामनिर्देशित प्रवर्ग (सामान्य व महिला), तर मंगरूळ आणि मुडी येथे खुले (महिला) आणि सारबेटे बु. येथे खुले असे आरक्षण निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद गटांमध्ये, पातोंडा आणि दहिवद हे दोन्ही गट नामनिर्देशित प्रवर्ग महिला यासाठी राखीव आहेत. मांडळ गट खुला महिला, कळमसरे खुला, तर जानवे गट खुला असा आरक्षण निकाल लागला आहे. या आरक्षणामुळे अनेक प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर होण्याची उत्सुकता जनतेत आणि कार्यकर्त्यांत वाढली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!