प्रारूप मतदार यादीतील गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची हरकत
अमळनेर : विक्की जाधव.
प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ उघड झाला आहे. नव्याने ऍड झालेली, वगळलेली तसेच डुप्लिकेट नावांची संख्या तब्बल दहा हजारांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अनेक मतदारांचे वोटर आयडी नंबर अस्तित्वात असूनही त्या पत्त्यावर संबंधित व्यक्ती आढळत नाहीत.

या संदर्भात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असताना, नगरपरिषद प्रशासनाचे म्हणणे आहे की “त्रयस्थ व्यक्तीची तक्रार स्वीकारली जाणार नाही.” त्यामुळे मतदार यादीतील गोंधळ उकलण्यासाठी प्रशासनाने स्वतः पुढाकार घ्यावा किंवा तपास करणाऱ्या नागरिकांना योग्य वेळ द्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रारूप मतदार यादीवर हरकत घेतली असून, निवेदनाद्वारे दुरुस्त केलेली मतदार यादी पुन्हा चाचपणीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.