जागेच्या वादावरून परस्पर विरोधात भिगवण पोलीस मध्ये गुन्हा दाखल ;कुंभारगाव येथील 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

जागेच्या वादावरून परस्पर विरोधात भिगवण पोलीस मध्ये गुन्हा दाखल ;कुंभारगाव येथील 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

(निलेश गायकवाड )

भिगवण पोलीसांच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार आज रोजी भिगवण पोलीस स्टेशनं मध्ये कुंभारगाव येथील 7 जणांच्या परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला..

सविस्तर मिळालेली माहिती

कुंभारगाव येथील गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढील व माहिती प्रमाणे..

कलम कलम 118(2), 118(1), 115(2), 351(1), 352,189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), शस्त्र अधिनियम क. 4,27 नुसार

फिर्यादी -श्री ज्ञानराज कुंडलिक धुमाळ वय 25 वर्ष कुंभारगाव येथील यांनी

आरोपी- 1) ज्ञानदेव निवृत्ती डोळे (2) सचिन ज्ञानदेव डोळे 3) नितीन ज्ञानदेव डोळे व 4) संतोष विठ्ठल डोळे, सर्व रा. कुंभारगाव, ता. इंदापुर, जि.पुणे व इतर 2 अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही.यांच्या विरोधात भिगवण पोलीस स्टेशनं ला या सर्वांनी कुऱ्हाड व तलवारीने मारले असल्याचे नंबर दुखापत झाल्याचे असल्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच परस्पर विरोधात

फिर्यादी- शिल्पा सचिन डोळे वय 29 वर्ष, व्यवसाय किराणा दुकान, रा. कुंभारगांव यांनी

आरोपी 1) पांडुरंग किसन धुमाळ 2) ओंकार पांडुरंग घुमाळ 3) ज्ञानराज कुंडलीक धुमाळ सर्व रा. कुंभारगांव,ता. इंदापुर, जि. पुणे व अनोळखी 3 पुरुष यांच्या विरोधात भिगवण पोलीस स्टेशन मध्ये कलम कलम 115 (2),118 (1), 119 (1) 352,191(1), 191(3), 189 (2) शस्त्र अधिनियम क.4.27 गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये फिर्यादी डोळे यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपींनी हातातील लोखंडी गजाने मारले असल्याचे सांगितले तसेच फिर्यादीच्या गळ्यातील 12.560 मिली ग्रॅम वजन किंमत 60640 रुपये जु. वा. की भांडणामध्ये आरोपी ज्ञानराज धुमाळ यांनी घेतले असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मिळत आहे.

यामध्ये कुंभारगाव येथील ग्रामपंचायत मिळकत हद्दीतील 177 चे वादावरून सदर हा वाद झाल्याचे निघून पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून समोर आला आहे. सदर वादामध्ये भिगवन पोलीस स्टेशनला परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास मिसाळ हे करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!