बेपत्ता मुलीचा सहा तासात शोध भोकरदन पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी ।

अपनी भाषा में पढ़े! Translate

बेपत्ता मुलीचा सहा तासात शोध भोकरदन पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी ।

भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील ।भोकरदन तालुक्यातील एका गावातुन 12 आक्टोंबर रविवारी अठरा वर्षीय मुलगी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातुन बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार भोकरदन पोलिस ठाण्यात प्राप्त होताच नोंद घेण्यात आली. पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस अंमलदार संदीप भूत्तेकर, पोलिस नाईक विकास जाधव, पोलिस अंमलदार सीमा देठे,जयश्री कुहेरे, यांनी त्वरेने तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक विश्लेषणावरुन मुलगी छत्रपती संभाजी नगर येथे असल्याचे निष्पन्न झाले.मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बिडवे , अंमलदार संदीप भूत्तेकर, पोलिस नाईक विकास जाधव, पोलिस अंमलदार सीमा देठे, जयश्री कुहेरे यांनी ही कामगिरी पार पाडली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!