भिगवण शेटफळ गटातील संभाव्य इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी;रणधुमाळी निवडणुकीची

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण शेटफळ गटातील संभाव्य इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी;रणधुमाळी निवडणुकीची

(निलेश गायकवाड)

पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत (सोमवार) दुपारी तीन झाली . जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्यांची सोडत दुपारी 12 वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती . तसेच याच दिवशी इंदापूर पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे राधिका लॉन्स इंदापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद मध्ये भिगवन शेटफळ गटासाठी सर्वसाधारण महिला तसेच पंचायत समिती भिगवण गणासाठी सर्वसाधारण महिला व शेटफळ गणासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे भिगवन शेटफळ गटामध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये महिलांना संधी मिळाली आहे त्यामुळे या गटातील व गणातील इच्छुक उमेदवारांची पक्षाकडून तिकीट मिळण्याची आग्रहाची भूमिका येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे.

भिगवन शेटफळ गटातील विविध मातब्बर मान्यवर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा देखील आहे. काही उमेदवारांनी तर यापूर्वीच देखील निवडणुकीची जोरदार तयारी केलेले दिसून येत आहे. तसेच यामध्ये नवयुवक देखील यामध्ये आपले उमेदवाराची इच्छुकता बाळगून असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चुरशीमध्ये कोण बाजी मारणार ही खूप मोठी कसोटी आहे. तसेच भिगवन शेटफळ गटामध्ये प्रामुख्याने चर्चेत असलेली नावे प्रामुख्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर माजी उप सभापती व ज्यांची भिगवन ग्रामपंचायत वरती एक हाती सत्ता आलेले पराग जाधव, तसेच युवक म्हणून चेहरा पुढे आलेले सध्या विविध सामाजिक उपक्रमांमधून महिला युवक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात यशस्वी झालेले स्वप्निल बंडगर,इंजिनियर नानासो बंडगर तसेच भिगवन ग्रामपंचायत तिचे माजी सरपंच हेमाताई माडगे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर,तसेच मदनवाडी ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच तुकारामजी बंडगर,मदनवाडी ग्रामपंचायत चे समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष कुंडलिक बंडगर, मा. उपसरपंच व भाजपा इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते तसेच तक्रारवाडी मधून युवा नेते प्रवीण वाघ यांच्या घरातील संभाव्य महिलांना उमेदवार यांच्यासह विविध मातब्बर नेते या निवडणुकीत उतरणार असल्याचे चर्चा किव्हा संभाव्या उमेदवार असल्याची चर्चा भिगवण शेटफळ गटामध्ये आहे. त्यामुळे यापैके अजून नवीन असतील. यामधील काही निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषद व पंचायत समिती यावर्ती तडजोडी करतील… त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीत अजून काही बदल किव्हा अजून काही चर्चा आपणास पाहायला मिळतील.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!