हो जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी संधी मिळाली तर त्याचे नक्कीच सोनं करून दाखवू-हर्षवर्धन ढवळे

अपनी भाषा में पढ़े! Translate

हो जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी संधी मिळाली तर त्याचे नक्कीच सोनं करून दाखवू-हर्षवर्धन ढवळे

(निलेश गायकवाड)

नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर झाली यामध्ये भिगवन व शेटफळगडे गटाला जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण स्त्री व पंचायत समितीचे सर्वसाधारण स्त्री अशा प्रकारचे आरक्षण पडले या आरक्षणासोबतच इच्छुकांची देखील नावे हळूहळू समोर येत आहे.

यामध्ये पराग जाधव,स्वप्नील बंडगर,अजिंक्य माडगे,नानासो बंडगर, संपत बंडगर,हनुमंत बंडगर,तुकाराम बंडगर,तेजस देवकाते, प्रवीण वाघ, कुंडलिक बंडगर अशी नावे समोर येत असतानाच आता मात्र मदनवाडी परिसरात एक नवं नाव समोर येत आहे ते म्हणजे हर्षवर्धन अनिलराव ढवळे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून कार्यरत असणारे हे नाव शेतकऱ्यांच्या सुखदुःखात अग्रेसर असून त्यांच्यासाठी नेहमी कार्यरत असते. शेतकरीपुत्र म्हणून त्यांची एक वेगळी ओळख मदनवाडी परिसरात आहे. दत्तात्रय भरणे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून मामांचे वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमाने घेत साजरे केले आहेत. त्यांचे चुलते प्रकाशबापू ढवळे हे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे यापूर्वी दहा वर्ष संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत त्याच्या माध्यमातून त्यांचा व या कुटुंबाचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांपर्यंत दांडगा संपर्क आहे.

गेली अनेक वर्ष ढवळे कुटुंब राजकीय पदापासून वंचित राहिलेले असताना आता मात्र या कुटुंबामध्ये हर्षवर्धन अनिल ढवळे यांच्या नावाने राजकीय पद भूषवत का..? व मामा त्यांना न्याय मिळवून देतात का? अशी चर्चा ढवळे यांच्या कुटुंबातील व नातेवाईक व नागरिकांना आहे .याबाबतीत हर्षवर्धन ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्ष ज्या ठिकाणी संधी देईल त्या ठिकाणी आत्मीयतेने काम करनार असल्याचे व मिळालेल्या संधीचे सोनं करून दाखवणार असल्याचे म्हटले. ढवळे त्यांनी बोलताना सांगितले दत्तात्रय मामा भरणे म्हणतात की कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याकडे पुढे पुढे करण्याची गरज पडत नाही माझं लक्ष सर्वांवर असतं प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल.

तसेच हर्षवर्धन ढवळे हे वकिलीचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित असून त्यांची नाळ सर्वसामान्यांशी असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी मिळावी अशी अपेक्षा मदनवाडी परिसरातील व्यक्त केली जात आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!