इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बबनराव धायतोंडे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय पारेकर
शिवाजी पवार,सत्यजित रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बिनविरोध निवड
(निलेश गायकवाड)
:- इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची निवड सभा इंदापूर रेस्ट हाऊस येथे उत्साहात पार पडली.या सभेमध्ये संघाची नवीन कार्यकारिणी शिवाजी पवार, सत्यजित रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने बिनविरोध निवडण्यात आली.
या निवडीत अध्यक्षपदी बबनराव धायतोंडे,उपाध्यक्षपदी दत्तात्रय पारेकर,सचिवपदी दत्तात्रय मिसाळ, खजिनदारपदी अरुण भोई, कार्याध्यक्षपदी अतुल सोनकांबळे व धनाजी शेंडगे,सहखजिनदारपदी महेश कळसाईत,तर प्रसिद्धी प्रमुखपदी प्रवीण पिसे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात सत्यजित रणवरे आणि शिवाजी पवार यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेच्या भावी वाटचालीसाठी दिशा दाखवली.त्यांनी सांगितले की, “पत्रकार संघाने सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन निष्पक्ष, जबाबदार आणि विधायक पत्रकारितेचे कार्य करणे हीच खरी सेवा आहे.”
यानंतर सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि संघाच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.