दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यात सुनावणी सुरू झाल्यानंतर बदलास नकार उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यात सुनावणी सुरू झाल्यानंतर बदलास नकार उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा..

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

दाव्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर दाव्यात कोणताही बदल करता येणार नाही, असा ठोस निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. सदर निर्णय न्यायव्यवस्थेत दाव्याच्या प्रक्रियात्मक टप्प्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.

उत्सवांना येईल रंगत जेव्हा.. स्वादिष्टची असेल संगत.

या प्रकरणात वादीने दाखल केलेल्या दाव्यात पुरावा देण्यास सुरुवात झाल्यानंतर काही दुरुस्ती आवश्यक असल्याचे सांगत दावा दुरुस्तीचा अर्ज दाखल केला होता. परंतु दिवाणी न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर अर्जदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रतिवादींच्या वतीने एड. निलेश भागवत यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, तीन साक्षीदार तपासण्यात आलेले असताना दावा दुरुस्ती केल्यास संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर जाईल आणि दाव्याच्या मूळ स्वरूपात बदल होईल, ज्यामुळे प्रतिवादींवर अन्याय होईल.

हा युक्तिवाद मान्य करत माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एकदा पुरावा नोंदविण्यास सुरुवात झाल्यानंतर दाव्यात दुरुस्ती करण्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळण्यात आली. या प्रकरणात प्रतिवादींच्या वतीने एड. निलेश भागवत यांनी काम पाहिले असून एड. सुप्रिया बुधळकर व एड. संकेत कुंजीर यांनी सहकार्य केले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!