निमा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा आरोग्य क्षेत्रातील नवचैतन्याला चालना! डॉ. हेमंत कदम यांची अध्यक्षपदी वर्णी..
अमळनेर : विक्की जाधव
आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांच्या नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तालुकास्तरीय नूतन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. सर्वानुमते झालेल्या निवड प्रक्रियेत डॉ. हेमंत कदम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून डॉ. सचिन पाटील (काटे) उपाध्यक्ष, डॉ. उमेश सोनवणे सचिव, डॉ. अक्षय न्हाळेदे सहसचिव, डॉ. हितेश मोरे कोषाध्यक्ष, डॉ. पंकज चौधरी प्रचारक तथा समन्वयक आणि डॉ. पुजा पंजवाणी (वाघुले) महिला समन्वयक म्हणून निवडून आल्या आहेत.

उत्सवांना येईल रंगत जेव्हा.. स्वादिष्टची असेल संगत.
नवीन कार्यकारिणीने येत्या काळात विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. वैद्यकीय शिबिरे, आरोग्य जनजागृती मोहीमा तसेच नवीन वैद्यकीय धोरणांवर चर्चासत्रे आयोजित करून डॉक्टर व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागर निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.निमा संघटनेने वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावणे, आरोग्यसेवेत आधुनिकतेसोबत आयुर्वेदिक उपचारांची उपयुक्तता वाढवणे आणि डॉक्टरांच्या हक्कांसाठी चा आवाज हे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व नूतन कार्यकारिणीत निवड झालेल्या सदस्यांचे सर्वच स्थरावारून अभिनंदन होत आहे.
