नॅशनल इंटीग्रॅटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर: डॉ. हेमंत कदम यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड…

अपनी भाषा में पढ़े! Translate

नॅशनल इंटीग्रॅटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर: डॉ. हेमंत कदम यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड…

अमळनेर- आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांच्या रजिस्टर्ड संघटना नॅशनल इंटीग्रॅटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तालुका शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये डॉ. हेमंत कदम यांची अध्यक्षपदी, तर इतर महत्त्वाच्या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

अध्यक्ष: डॉ. हेमंत कदम
उपाध्यक्ष: डॉ. सचिन पाटील (काटे)
सचिव: डॉ. उमेश सोनवणे
सहसचिव: डॉ. अक्षय न्हाळेदे
कोषाध्यक्ष: डॉ. हितेश मोरे
प्रचारक तथा समन्वयक: डॉ. पंकज चौधरी
महिला समन्वयक: डॉ. पूजा पंजवाणी (वाघुले)

नूतन कार्यकारिणीने वैद्यकीय शिबिरांचे आयोजन, नवीन वैद्यकीय धोरणांवर चर्चासत्रांचे आयोजन, डॉक्टरांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यसेवांच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निमा तालुका शाखा यापुढेही समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!