उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांच्या मार्गदर्शनात महसूल पथकाची कारवाई!

अपनी भाषा में पढ़े! Translate

उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांच्या मार्गदर्शनात महसूल पथकाची कारवाई

 

अमळनेर विक्की जाधव.

मौजे आर्डी–जवखेडे रस्त्यावर आज अंमळनेर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाई मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर श्री. नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच मा. तहसीलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर पथकाने छापा टाकून दोन ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केले असून, त्यांना पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीस आळा बसण्यास मदत होणार असून महसूल विभागाच्या तात्काळ प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कारवाईत वावडे मंडळ अधिकारी श्री. पी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी श्री. संदीप माळी (मांडळ), श्री. एम. आर. पाटील (जैतपीर), श्री. विक्रम कदम (शाहपुर), श्री. जितेंद्र पाटील (शिरसाले बु.), श्री. विकेश भोई (बाम्हने), श्री. अमोल चक्रे (जवखेडे), श्री. आकाश गिरी (पातोंडा), श्री. सुधीर पाटील (गडखांब) व श्री. पवन शिंगारे (सावखेडे) यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!