जि.प.केद्रींय शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम नारायण दांडगे यांचा सुरंगली गावकऱ्यांच्या वतीने सत्कार…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जि.प.केद्रींय शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम नारायण दांडगे यांचा सुरंगली गावकऱ्यांच्या वतीने सत्कार…

भोकरदन तालुका प्रतिनिधी ।संजीव पाटील । भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील रहिवासी तुळशीराम नारायण दांडगे हे जि.प.प्रा.शाळेच्या पिंपळगांव रेणुकाई येथील केंद्रीय शाळेवर मुख्याध्यापक पदी कार्यरत होते.ते नुकतेच सेवानिवृत्त झाले.सुरंगली गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या वतीने सुरंगली येथे त्यांचा सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. तुळशीराम नारायण दांडगे यांनी माहोरा येथील जि.प.केद्रींय शाळेचे मुख्याध्यापक होते. ते बत्तीस वर्षे शासकीय सेवा करुन सेवानिवृत्त झाले. सुरंगली येथील काशी विश्वेश्वर देवस्थानच्या वतीने दांडगे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकारानं कडुन सत्कार करण्यात आला. यावेळी सुरंगली येथील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच डॉ. संजीव पाटील पत्रकार , अंगणवाडी सेविका मंदाताई संजीव पाटील,भोंडे मामा, रामभाऊ वानखेडे सर,शेख एजाजभै, रामदास टोंपे , माजी सैनिक कडुबा लोखंडे, सुखदेव सपकाळ, माजी सरपंच सौ.संगीताताई सपकाळ, भगवान फोलाने ,अरुण दांडगे, गणपत दांडगे , संतोष काळे
धनराज काळे ,
समदभै पत्रकार,सुभाष वर्पे पत्रकार,संजय जाधव, संजय शेनफड दांडगे, किरण अप्पा खोंडे यांच्या सह शिक्षक कर्मचारी अनेक गावकरी आप्तेष्ट नातेवाईक मित्र मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमांचे संचलन सोळुंके सर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!